जिल्ह्यातील दिव्यांगासाठी मंजूर झालेल्या अतिरिक्त दुचाकींसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने अर्ज करण्याच्या मुदतीमध्ये वाढ केली आहे. यापूर्वी दिव्यांगांनी अर्ज करण्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार अर्जही स्वीकारण्यात आले. परंतु, पुरेशा प्रमाणात अर्ज आले नसल्याने अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. यासाठी ७५ टक्के अथवा त्याहून अधिक दिव्यांग असणाऱ्या २० ते ६० वयोगटातील पात्र दिव्यांगांना अर्ज करता येणार आहे. ता. पं. कार्यालयात याबाबत २३ रोजी सायंकाळी ५ वा. पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असून अधिक माहितीसाठी ०८३१ २४७६०९६/७ या क्रमांकावर संपर्काचे आवाहन केले आहे
दुचाकी अर्जासाठी मुदतवाढ
By Akshata Naik

Previous articlePU, Degree Colleges to Reopen from Tomorrow
Next articleदुचाकी घसरून होसुर येथील तरुणीचा मृत्यू