शेकडो विध्यार्थ्यांना रद्दीतून बुद्धीकडे घेऊन जाणाऱ्या शांताबाई वृद्धाश्रमाचा विद्याआधार संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी विनायक विवेक बोंगाळे यांची तर सेक्रेटरी पदी ऍलन मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
रविवार दि १८ रोजी विशेष बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी अध्यक्ष विनायक लोकूर, संतोष ममदापुर, विजय पाटील, डॉ. माधव प्रभू आणि विजय मोरे आदींच्या उपस्थितीत ही निवड झाली. नवीन कार्यकारिणीत खजिनदारपदी कोमल शिरसाठ, सह खजिनदारपदी गंगाधर पाटील, जॉईंट सेक्रेटरी पदी प्रसाद सु. प्रभू आणि सदस्यपदी विश्वास पाटील, संतोष ममदापुर आणि विजय मोरे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
सल्लगार मंडळ सदस्यांत विनायक लोकूर, विजय पाटील, डॉ. माधव प्रभू यांचा समावेश आहे.