जिल्हा पंचायत बेळगाव, शालेय शिक्षण विभाग बेळगाव आणि सीखें संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “सीखें इंडिया उत्सव 2024 ” या शीर्षकाखाली बेळगाव शहर झोन महांतेश नगर कनबर्गी, टिळकवाडी, वडगाव, शहापूर, कसाबाग, गांधीनगर, सदाशिव नगर, PHQ, चव्हाटा गल्ली, गणपथ गल्ली आणि फूलबाग गल्ली सारख्या विविध क्लस्टर्सच्या सरकारी कन्नड आणि मराठी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव शहर झोनचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री.आय.डी. हिरेमठ यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सीखे फाउंडेशन बेळगाव शहर परिसरातील सरकारी शाळांमधील शिक्षकांना कोचिंग आणि प्रशिक्षण देऊन, शिक्षकांना नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती शी अवगत करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले व “मुलांची प्रतिभा बाहेर आणण्याचे काम केले.
वर्षा परचुरे, टीचर इनोव्हेटर प्रोग्रामच्या राष्ट्रीय व्यवस्थापक, सिखे संस्था मुंबई, श्रीमती ज्योती शिंदे, बीआरपी माध्यमिक विभाग, श्रीमती ललिता कसनावार, बीआरपी प्राथमिक विभाग, बेळगाव शहर झोन आणि बेळगाव शहर झोनचे सर्व सीआरसी, मुख्याध्यापक, संबंधित शाळांचे शिक्षक व प्रदर्शनात सहभागी झालेल्या मुलांचे काम पाहून सर्व पदाधिकारी यांनी मुलांना प्रोत्साहन दिले. 650 हून अधिक मुलांनी या प्रदर्शनात सहभाग घेऊन आपले शिक्षण सादर केले.
या कार्यात सिखे संस्थेचे बेळगावी मधील प्रतिनिधी कु. शिल्पा देसाई, सौ. रूपा मॅडम आणि सरिता गोवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सीखें इंडिया उत्सव 2024
