बेळगावचा होतकरू शरीर सौष्ठवपटू प्रताप कालकुंद्रीकर याने तामिळनाडू येथे नुकत्याच पार पडलेल्या 14 व्या ज्युनिअर मि. इंडिया शरीर सौष्ठव स्पर्धेत अभिनंदन यश मिळविले आहे.
इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनने तामिळनाडू येथे गेल्या 23 फेब्रुवारी रोजी उपरोक्त स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रताप कालकुंद्रीकर याने या स्पर्धेतील मास्टर्स 40 ते 49 वर्षे 80 किलोपर्यंतच्या गटात द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक पटकाविले. मि. कर्नाटक मास्टर किताबाचा मानकरी ठरलेला प्रताप हा शहरातील रेसिडेन्सी क्लब जिम या व्यायाम शाळेत व्यायामाचा सराव करतो. उपरोक्त यशाबद्दल त्याचे शरीर सौष्ठवक्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.