चलवेनहट्टी येथील गावच्या प्रवेशद्वार कमान बांधण्याच्या कार्य आजी माजी सैनिक संघटना चलवेनहट्टी यांच्या वतीने होत आहे गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कमानीच्या कार्याचा शुभारंभ आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते.त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर काॅलम भरणीचा कार्यक्रम पार पडला या वेळी सुहासनी महिलांनी काॅलमची पुजा केली यावेळी कार्यक्रमस्थळी भढजीच्या उपस्थितीत जोतिबा मारुती पाटील तसेच त्यांच्या पत्नी उज्वला पाटील यांच्या वतीने पुजा करण्यात आली त्यानंतर आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील तसेच सर्व पदाधिकारीच्या व ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते काॅलम भरणी करण्यात आली या गावाच्या प्रवेशद्वारील कमानीमुळे गावच्या सौंदर्यात भर पडणार आहे.चलवेनहट्टी येथे सैनिक संघटनेची स्थापना होऊन जेमतेम एक वर्ष पूर्ण झाले असताना कमान बांधणीचे कार्याला सुरुवात केल्याने गावकरी सैनिक संघटने बाबत समाधान व्यक्त करत आहेत.यावेळी निगाप्पा हुंदरे, नारायण हुंदरे अर्जुन बडवानाचे,मारुती बडवानाचे,संतराम आलगोंडी, मल्लाप्पा हुंदरे,निंगानी कुमाणा हुंदरे राहुल पाटील,शिवराय आलगोंडी,जोतिबा बडवानाचे, गुरुनाथ पाटील, एस.डी.एम.सी तसेच कामगार संघटना अध्यक्ष मनोहर हुंदरे, मनोहर राजाई, दिपक हुंदरे,किरण पाटील,भरमा पाटील,परशराम आलगोंडी, भुषण पाटील, जोतिबा शिवाजी बडवानाचे, विनोद आलगोंडी, शोभा पाटील, कल्पना पाटील, जयश्री हुंदरे, आरती आलगोंडी,रेणुका हुंदरे संजना पाटील आदी उपस्थित होत्या
चलवेनहट्टी येथे प्रवेशद्वारवर कमान बांधण्याच्या कामाला सुरुवात
By Akshata Naik

Previous articleशिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती साजरी