महिला विद्यालय हायस्कूल बेळगांव शाळेचा दहावीचा निकाल 87% टक्के लागला असून लावण्या परशुराम सांबरेकर हिने (579गुण) 92.64% टक्के गुण मिळवून विशेष श्रेणीसह शाळेत प्रथम आली आहे. चैतन्या सोमनाथ पाटील (568 गुण) 90.88% द्वितीय व अक्षता संजय पावशे हिने (545गुण) 87.20% तृतीय क्रमांक मिळविला.
शाळेतून एकूण 76 विद्यार्थिनी परीक्षेला बसलेल्या. त्यापैकी 66 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. यामध्ये 5 विद्यार्थिनी विशेष श्रेणीमध्ये, 32 विद्यार्थिनी प्रथम श्रेणी व 12 विद्यार्थिनी द्वितीय श्रेणीसह यशस्वी झाल्या आहेत. तसेच 17 विद्यार्थिनींनी उत्तीर्ण श्रेणी मिळवली. विद्यार्थिनींना शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ पाटील व इतर विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले महिला विद्यालय हायस्कूल सर्व स्टाफ व महिला विद्यालय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या कडून विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा