चन्नम्मानगर येथील श्री महालक्ष्मी देवस्थानचा वार्षिक उत्सव उत्साहात पार पडला. गुरुवार दि. १६ रोजी सायंकाळी खादरवाडी येथील वारकरी भजनी मंडळाचे भजन झाले. शुक्रवारी सकाळी कुंकुमार्चन तर सायंकाळी चिदंबरनगर येथील लक्ष्मी शोभान भजनी मंडळाचे भजन झाले. शनिवार दि. १८ रोजी सकाळी अभिषेक आणि अलंकार झाला. यानंतर १०.३० ते १२ या वेळेत गणहोम होऊन महाप्रसादाला सुरुवात झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू असलेल्या महाप्रसादाला भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी ६ वाजता पालखी सेवा निघाली. तसेच रणरागिणी भजनी मंडळाकडून टिपरी नृत्य झाले.
महालक्ष्मी देवस्थानचा वार्षिकोत्सव चन्नम्मानगर येथे उत्साहात
By Akshata Naik
Previous articleशहरातील बारा आरो प्लांट बंद अवस्थेत