काहेरचा पदवीप्रदान सोहळा आणि आयसीएमआर-एनआयटीएमच्या स्थापना दिन कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनकड सोमवारी (दि. २७) बेळगावात येत आहेत.सोमवारी सकाळी १० वाजता उपराष्ट्रपती धनकड, राज्यपाल थावरचंद गेहलोत, आरोग्य मंत्रालयाचे सचिव डॉ. राजीव बहल आयसीएमआर एनआयटीएमच्या स्थापना दिन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता केएलई संस्थेच्या शताब्दी सभागृहात काहेरच्या पदवीप्रदान सोहळ्यात सहभागी होणार आहेत. दोन्ही कार्यक्रमाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.