मोटार आणि जीपच्या धडकेत युवक-युवती जागीच ठार झाल्याची घटना काल सायंकाळी कणगले जवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. या झालेल्या भीषण अपघातात प्रशांत कल्लापा कोलागिरी वय 22 आणि श्रद्धा तेलसंगमठ व या दोघांचा जागीच मृत्यू झाला.तर नागराज चौगुले हा जखमी झाला आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निपाणी संकेश्वर जाणाऱ्या मोटारीला मालवाहू जीपने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला असून मयत झालेले दोघेही मोटारीत समोरच्या सीटवर बसले होते तर जखमी नागराज चौगुले हा चालकाच्या पाठीमागे सीटवर बसला होता. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी संकेश्वर असे पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिरी पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी भेट देऊन पंचनामा केला.