No menu items!
Thursday, August 28, 2025

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी

Must read

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (4 जून) होणार असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील , यांनी बेळगावच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व तयारी करण्यात आली असल्याची माहिती दिली
बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बेळगाव आर.पी.डी. विद्यापीठ आवारातील तयारीची पाहणी केल्यानंतर रविवारी (२ जून) मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँग रूम्स निवडणूक निरीक्षक, उमेदवार आणि निवडणूक प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडल्या जातील.

सकाळी ८ वाजल्यापासून ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पोस्टल मतमोजणीसाठी दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने तांत्रिक समस्या हाताळण्यासाठी आठ तंत्रज्ञांची नियुक्ती केली आहे.

आतापर्यंत पोस्टल बॅलेटला 11,148 मते मिळाली आहेत. मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत पोस्टल मतपत्रिका स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मतमोजणीसाठी एकूण 552 पर्यवेक्षक/सूक्ष्म निरीक्षक आणि मतमोजणी कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 लोक आणि तीन अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतमोजणी केंद्रावर उपस्थित एजंट फॉर्म 7 मधील प्राधान्यक्रमानुसार बसतील.

मोबाईल, बिडी, सिगारेटवर बंदी

मतदान केंद्रावर मोबाईल फोन वापरण्यास बंदी असेल. याशिवाय त्यांना तंबाखू, बिडी, सिगारेट, पान आदी आणण्यास परवानगी दिली जाणार नाही.
मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली आहे आणि उमेदवार आणि एजंट यांच्या सोयीसाठी एक सशुल्क कॅन्टीन उघडले जाणार आहे

संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात दारू विक्री व वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार आहे. याशिवाय मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात सी.आर.पी.सी. कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेशही लागू करण्यात आला असून या भागात कोणत्याही मिरवणुकीला किंवा विजयोत्सवाला परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती दिली

७१.४९ टक्के मतदान

02 बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 71.49 टक्के मतदान झाले आहे. एकूण 19,23,788 मतदारांपैकी 13,75,383 जणांनी मतदान केले. जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरळीत व पारदर्शक मतमोजणीसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.असे सांगितले

कडेकोट पोलीस बंदोबस्त :

यावेळी बोलताना बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग म्हणाले की, पाच केएसआरपीसह कडेकोट बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे.

शहरात 300 ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून ड्रोनच्या माध्यमातूनही देखरेख केली जात आहे.
मतमोजणी केंद्रात दोन डीसीपींच्या नेतृत्वाखाली 13 निरीक्षक काम करणार आहेत. सुरळीत वाहतूक आणि पार्किंगसह सर्व व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग व इतर अधिकाऱ्यांनी मतमोजणी कक्ष, पार्किंग, सुरक्षा कर्मचारी तैनात, खानपान व्यवस्था, मीडिया सेंटर आदी सुविधांची पाहणी केली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनाकेरी, महानगरपालिकेचे आयुक्त लोकेश पी.एन., अन्न विभागाचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरनाथ कडबुरा, तहसीलदार सिद्धराय भोसगी आदी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!