मालदीव येथे होणाऱ्या कनिष्ठ दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी पात्र ठरलेला बेळगावचा 20 वर्षीय युवा शरीरसौष्ठवपटू गणेश पाटील याला बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेतर्फे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
बेळगावचा होतकरू शरीरसौष्ठवपटू गणेश पाटील यांनी चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या कनिष्ठ मि. इंडिया शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे मालदीव येथे येत्या शनिवार दि. 8 जून 2024 रोजी होणाऱ्या कनिष्ठ दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली आहे. याबद्दल बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्यावतीने अविनाश पोतदार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गणेश पाटील याचे अभिनंदन करून आशियाई स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी अजित सिद्दन्नावर, एम. गंगाधर, हेमंत हावळ, बसवराज अरळीमट्टी, सुनील राऊत आदी उपस्थित होते.