जादूटोणा केल्याच्या संशयातून महिलेसह तिघांवर सहा जणांनी विळा, जांबियासह धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना रायबाग तालुक्यातील कंकणवाडी येथे घडली.कंकणवाडीत शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये आधीपासून वितुष्ट आहे. एका कुटुंबाने शेताच्या बांधावर उतारा ठेवल्याचा व आपल्यावर जादूटोणा केल्याचा राग होता. यातूनच त्यांनी घरातील महिला, तिचा मुलगा व वृद्धावर सहा जणांनी जोरदार हल्ला चढवला. यामध्ये महिलेच्या उजव्या हाताचे हाड मोडले असून मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. विळा, जांबियासह धारदार शस्त्राने हा हल्ला केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. पोलिसांनी आतापर्यंत चौघांना ताब्यात घेतले आहे
रायबाग मधील कंकणवाडीत तिघांवर हल्ला -करणी चा संशय
By Akshata Naik

Previous articleआकाश इन्स्टिटयूड ची पत्रकार परिषद