बेळगाव बेंगलोर विमान सेवा बंद करू नये अशी मागणी चिकोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी केंद्रीय नागरी विमान मंत्र्याकडे केली आहे यासंबंधी त्यांनी निवेदन सुद्धा पाठविले आहे. बेंगलोर बेळगाव विमानसेवा 27 ऑक्टोबर पासून थांबवत असल्याचे जाहीर करण्यात आले होते मात्र प्रवाशांची संख्या या भागात जास्त असल्याने विमानसेवा बंद करू नये अशी मागणी चिकोडीच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.