युवा समिती सैनिकांचे आवाहन
काल 27 ऑक्टोबर रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे सीमा भागातील युवा समिती सैनिकांची बैठक पार पडली,या बैठकीत मुख्यता येता एक नोव्हेंबर हा सुतक दिन काळा दिन म्हणून कसा पाळावा, यासाठी रूपरेषा ठरवण्यात आली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक शिवाजी मंडोळकर हे होते, या बैठकीत अनेक जणांनी आपले विचार मांडले, या बैठकीला खास करून निपाणी युवा समितीचे पदाधिकारी व सांगली येथील युवकांनी सहभाग घेतला,सांगलीसह निपाणी येथेही काळातील गांभीर्याने पाळण्यात येईल अशी ग्वाही या युवकांनी दिली, या बैठकीला खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला व 1956 साली झालेल्या अन्यायाला आता 69 वर्षे पूर्ण झाली असून तत्कालीन केंद्र सरकारचा निषेध केला,तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी पुढील काळात युवकाने त्यात भव्य प्रमाणात सहभाग घ्यावा,सर्वांनी गांभीर्याने भाग घेऊन मुक सायकलफेरी यशस्वी करण्याचे आवाहन केले. या बैठकीला पीयूष हवळ यांनीही मार्गदर्शन केले तसेच निपाणी युवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील,सुनील किरळे, कपिल बेलवळे,रमेश कुंभार,तात्यासाहेब कांबळे तर सांगलीहून रविकिरण विश्वनाथ काशिद,सूरज दरेकर, किरण काकडे,प्रशांत मयेकर,अभिनंदन पाटील,प्रथमेश मगदूम उपस्थित होते,मनोहर हूंदरे,चंद्रकांत पाटील,रमेश माळवी, अशोक घगवे,अभिजीत मजुकर, बळीराम पाटील,शांताराम होसुरकर,राजू पाटील,भूपाल पाटील,रजत बोकडे,प्रसाद मरगाळे, प्रकाश हेब्बाजी, युवा सेनेचे विनायक हुलजी,बाबू पावशे,मल्लाप्पा पाटील, प्रकाश सुतार,असे शेकडो युवक या बैठकीला उपस्थित होते,प्रवीण रेडेकर यांनी शेवटी आभार मानले.