महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलकाबाबत सुरू असलेल्या चार खटल्यांपैकी सोमवारी दोन खटल्यांसंदर्भात न्यायालयासमोर साक्षी नोंदविण्यात आल्या. जुलै २०१४ मध्ये प्रचंड पोलीस फौजफाट्यासह जिल्हा प्रशासनाने ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविला होता. याविरोधात आंदोलन करणाऱ्या मराठी जनतेला पोलिसांनी अमानुष मारहाण केली. तसेच एकूण २२२ जणांवर गुन्हे दाखल करून खटले भरले.
यापैकी १२२ अंतर्गत ४७, १२५ अंतर्गत ४२, १२६ अंतर्गत २६, ३०६ अंतर्गत ४३ आरोपी आहेत. यापैकी सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी १२५/१५, १२२/१५ यासंदर्भात न्यायालयासमोर साक्ष नोंदविण्यात आल्या