स्वामी विवेकानंद युवक संघ आणि एसडीएमसी निट्टूर, आयोजित निट्टूर तालुका खानापूर येथे “जागर प्रतिभेचा” या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.
खानापूर व बेळगांव तालुक्यातील प्राथमिक मराठी शाळांतील पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्पर्धा शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर व शनिवार दि. ९ नोव्हेंबर रोजी नीट्टूर, तालुका खानापूर येथे भरविल्या आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
इयत्ता पहिली ते चौथी हा लहान गट व इयत्ता पाचवी ते सातवी हा मोठा गट. अशा दोन्ही गटांसाठी सामान्य ज्ञान, भाषण, निबंध, शृतलेखन व हस्तकला अशा स्पर्धा होणार आहेत. लहान गटांसाठी २००१, १५०१, १००१, ५०१, ५०१ असे बक्षीस देण्यात येणार आहे. व मोठ्या गटासाठी २५०१, २००१, १५०१, १००१, ५०१ असे अनुक्रमे बक्षीस आहेत. शिवाय विजेत्यांना आकर्षक चषक भेट देण्यात येईल.
शिवाय मराठी लोकनृत्य या स्पर्धा शनिवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.स्पर्धेसाठी पहिली ते सातवी असा एकच गट आहे. त्यासाठी ४००१, ३००१, २००१, १५०१, व १००१ अशी बक्षिसे व चषक देण्यात येणार आहेत.
नांव नोंदवण्यासाठी ५ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे त्यासाठी 7259142050, 7676724392 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.