गुन्हे गारांना कडक शिक्षा करण्याची मागणी
हुबळीत झालेल्या दंगल आणि पोलीस ठाण्यावर हल्ला प्रकरण मागे घेतल्याबद्दल आज विविध संघटनांनी बेळगाव शहरात निदर्शने करत आंदोलन केले आणि आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले.
सन् 2022 साली हुबळी शहरातील जुने हुबळी पोलीस ठाण्यावर व पोलिसांवर जमावाने घातक हल्ला करून सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.हे प्रकरण राज्य सरकार मागे घेत आहे. प्रकरणातील आरोपींना मुक्त करणे अत्यंत चुकीचे असल्यामुळे आंदोलन छेडण्यात आले
दि 10 ऑक्टोबर 2022 रोजी पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. दगडफेकीत पोलीस ठाणे इमारत, सरकारी व सार्वजनिक वाहनांवर हल्ला केला. अशी घटना समाजात मोठा अपराध म्हणून गणली आहे तसेच, कायद्याप्रमाणे विविध कलमानुसार गुन्हे नोंद करून प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना मुस्लिम मतांच्या दृष्टीकरणांतर्गत काँग्रेस सरकार हे प्रकरण मागे घेण्यास सरसावले आहे सरकारच्या अशा निर्णयामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे व कायदा सुव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास डगमगला आहे
त्यामुळे गुन्हेगारांना कायदेशीर मार्गाने अटक करून चौकशी करून शिक्षा देऊन व कायदा सुव्यवस्था राखवी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.