अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तर्फे २८नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान अंमलीपदार्थ मुक्त परिसर अशी मोहीम राबविली जाणार आहे. व्यसनमुक्तीसाठी महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी जागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग व विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधिनता वाढत असल्याने अभाविपकडून ही मोहीम राबवून अंमलपदार्थ मुक्त परिसर करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.यावेळी जिल्हा संघटक सचिन हिरेमठ, सचिन गोदिगेरी, देवेंद्र सन्नमण्णावर, यल्लाप्पा बोमणहळ्ळी, राघवेंद्र यांच्यासह इतर उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे आजपासून ही जनजागृती
By Akshata Naik
Must read
Previous articleही असणार विशेष रेल्वे