मार्कडेयनगर, एपीएमसीसमोर येथील निवासी मल्लिकार्जुन सत्तीगेरी यांच्या निवासस्थानी द्विभुज स्वयंभू वरदसिद्धिविनायक मंदिराची प्रतिष्ठापना मार्कंडेयनगरात २०१८ साली करण्यात आली आहे. तेथे यंदा ६ डिसेंबर रोजी महालक्ष्मी-महासरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिराचे कळसारोहण होणार आहे. या मंदिरात याहीवर्षी २ ते ६ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ डिसेंबर रोजी सायंकाळी मंगलवाद्यांसहित पूर्ण कलश मिरवणूक संगमेश्वरनगर एपीएमसीजवळील संगमेश्वर मंदिरापासून वरदसिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाईल. ३ ते ५ डिसेंबरपर्यंत रोज सायंकाळी ७.३० वा. महाआरती आणि दिवसभर धार्मिक कार्यक्रम होतील. ६ डिसेंबर रोजी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सरस्वती, महालक्ष्मी मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मंदिराचे कळसारोहण परमपूज्य म. नि. प्र. गुरुसिद्ध महास्वामीजी कारंजीमठ, बेळगाव यांच्या हस्ते होईल. त्याच दिवशी दुपारी महाप्रसाद होणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोककल्याणासाठी मल्लिकार्जुन सत्तीगेरी यांनी २१ दिवसांच्या उपवासाचे व्रत ठेवले आहे. भाविकांनी सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे