बेळगाव येथे कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन दि. ९/१२/२०२४ रोजी सुरु होत आहे. या अधिवेशन काळात दि. ९/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास परवानगी याचा रितसर अर्ज जिल्हाधिकारी बेळगाव यांना दिला आहे. गेल्या ३ ते ४ वर्षात कर्नाटक सरकारचा व्यवहार पाहता दडपशाहीने कर्नाटक सरकार महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीला घेऊ देत नाही तसेच महाराष्ट्रातील नेत्याना बेळगावला जाणेस बंदी घातली जाते हे लोकशाहीला सोडून आहे. याच काळात कर्नाटकातील अनेक मंत्री महाराष्ट्रात व कोल्हापूरला येतात त्यांना महाराष्ट्र सरकार कोणतीच बंदी घालत नाही. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने मागणी करण्यातआली .
बेळगाव येथील ९/१२/२०२४ च्या महामेळाव्यास बेळगाव जिल्हाधिकारी यांनी परवानगी दयावी व महाराष्ट्रातील नेत्याना बेळगावला जाणेस बंदी घालू नये. बेळगाव जिल्हाधिकारी यांना महामेळाव्यास परवानगी दिली नाही तर महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने दि. ९/१२/२०२४ रोजी आंदोलन करु .कर्नाटकातील वाहनाना महाराष्ट्र सीमेवर अडवू असा इशाराजिल्हाधिकारी बेळगाव याना लेखी स्वरुपात कळवाव्यात यावा अशी मागणी करण्यात आली