बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी आझाद नगर आणि जुने गांधी नगर या लोकवस्तीच्या भागांना भेट दिली आणि याठिकाणी विकास कामांना चालना दिली.
याठिकाणी वर्षानुवर्षे निकृष्ट पायाभूत सुविधांनी त्रस्त होते या भागात, विशेषत: आझाद नगरात पावसाळ्यात पाणी साचणे आणि रस्त्यांचे गंभीर नुकसान यासह महत्त्वपूर्ण आव्हानांना नागरिकांना तोंड द्यावे लागत होते.
यावेळी अधिकारी आणि नगरसेवकांसह आमदार सेठ यांनी रस्त्यांच्या स्थितीची आणि इतर नागरी सुविधांची पाहणी केली. त्यांनी रहिवाशांना येणाऱ्या अडचणी मान्य केल्या आणि त्यात सुधारणा होत असल्याचे आश्वासन दिले.
“या भागातील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे, आणि या समस्या सोडवण्याची वेळ आली आहे. नवीन रस्त्यांचे बांधकाम लवकरच सुरू होईल, आणि आम्ही ड्रेनेज आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अतिरिक्त विकास प्रकल्प देखील हाती घेणार आहोत,” असे सेठ म्हणाले.