इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने बेळगावमध्ये उद्या 16 जानेवारी रोजी आयोजित 16 व्या वरिष्ठ राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठीची भारतीय रेल्वे संघातील स्पर्धकांची निवड चांचणी मंगळवारी शहरातील मॉर्डन जिममध्ये यशस्वीरित्या पार पडली. यावेळी रेल्वे संघातील स्पर्धकांनी परीक्षकांच्या सूचनेवरून विविध पोझच्या माध्यमातून आपल्या शरीर सौष्ठवाचे अप्रतिम सादरीकरण केले. याप्रसंगी रेल्वे संघाचे मुख्य प्रशिक्षक रवींद्र पाटील, एस. भट्टाचार्य, एम. आरुष, राजशेखर राव, आसिफ कुसगल, मॉर्डन जिमचे संस्थापक किरण कावळे, संचालक कीर्तीश कावळे आदिंसह रेल्वेचे अधिकारी व मॉर्डन जिमचे सभासद उपस्थित होते
राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी रेल्वेच्या स्पर्धकांची निवड चांचणी
By Akshata Naik

Previous articleरंगूबाई पॅलेस मध्ये आज समितीची बैठक