बेळगाव (प्रतिनिधी) :- छत्रपती धर्मवीर संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीने धर्मवीर संभाजीराजेंचा राज्याभिषेक दिन गुरुवारी सकाळी मोठ्या दिमाखात साजरा करण्यांत आला,
यावेळी जय जिजाऊ-जय शिवराय, यांच्यासह धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा मोठा जयघोष करण्यात आला.अठरा-पगड जातींना सोबत घेत स्वराज्य निर्माण करण्याचे काम छत्रपती शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांनी केले. समाजातील विकृत गोष्टीना पायबंद घालण्याचा संदेश छत्रपतींनी दिला. त्यांच्या विचारांनी तरुणांनी प्रभावित होत ते स्वराज्य घडवावे ,असा संदेश उपस्थितांना माजी आमदार अनिल बेनके यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मोरे यांनी केले
प्रारंभी माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज स्मारकास दुग्धाभिषेक घालून विधिपूर्वक पूजा करून नगरसेवक जयतीर्थ सौन्दती, व शंकर पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना धर्मवीर संभाजीराजे स्मारक समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला उजाळा दिला. धर्म रक्षणासाठी शंभूराजांनी केलेला त्याग, त्यांचे युध्द कौशल्य याविषयी माहिती दिली. ‘जगावे कसे हे शिवरायांनी शिकवले, तर मरावे कसे हे शंभूराजांनी शिकवले’ अश्या शब्दात सुनिल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी नगरसेवक शंकर पाटील, जयतीर्थ सौन्दती, धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव,श्रीनाथ पवार,प्रमोद कग्राळकर, निशांत कुडे श्रवण जुटे, मंथन कामुले, सुमित पाटील, प्रसाद पवार, ऋषभ मोहिते, निखिल पाटील, महेश सोनदी, प्रथमेश किल्लेकर, ओंकार मोहिते, आकाश कुकडोलकर प्रसाद मोरे, ओमकार पुजारी, कुंज नावगेकर, ओमकार भोसले, युवराज भोसले,सुशांत तरहळेकर,वैभव छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण समितीचे सर्व सदस्य, महिला भगिनी, युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.