कुंभ मेळाव्यासाठी प्रयागराज येथे गेलेल्या बेळगावातील चार भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . कुंभ मेळाव्यात झालेल्या भीषण चेंगराचेंगरी मध्ये शेट्टी गल्लीतील अरुण कोपर्डे वडगाव येथील ज्योती हत्तरपाट त्यांची मुलगी मेघा हत्तरपाठ यांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी ते कुंभ मेळाव्या करिता बेळगाव मधून प्रयागराज येथे गेले होते. यावेळी मेळाव्यात झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत सर्वजण बेपत्ता झाले त्यानंतर या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली यावेळी त्यांचा मृत्यू झाला .याप्रसंगी वारंवार कुटुंबीय त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांची मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बेळगावातील चार भाविकांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
e