No menu items!
Thursday, February 20, 2025

बोडकेनट्टीत १६ रोजी गिरणी कामगारांची बैठक

Must read

एकेकाळी मुंबईचा मुख्य व्यवसाय म्हणजे कापड गिरण्या मुंबईत मोठ्या प्रमाणात गिरण्या चालत होत्या जवळपास पाच पिढ्यानी गिरणीत काम केले आणी याच गिरण्यात आपल्या सीमाभागातील म्हणजे बेळगावच्या कामगाराची संख्या सुध्दा मोठी होती. मुळात गिरणी कामगारांनी मुंबईच्या विकासात मोठे योगदान दिले त्यामुळे मुंबई एक आधुनिक विकसित शहर झाले महाराष्ट्र सरकारने व‌ मुंबई महानगर पालिकेने १९९० मध्ये गिरण्यांच्या जागेचा वापर वाणिज्य रहिवासी वापरासाठी करण्यास परवानगी दिली. या निर्णयामुळे मालकांना प्रचंड धन संपत्ती लाभली परंतु या निर्णयामुळे गिरणी कामगारांवर‌ व त्यांच्या कुटूंबावर संक्रांत आली आणी गिरणी कामगार बेरोजगार झाले त्यामुळे सर्व श्रमिक संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांना सरकारच्या निर्णयाला विरोध केल्यामुळे अखेर शासनाने गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना घरं देण्याचे निर्णय घ्यावा लागला पण या निर्णयाची अंमलबजावणी झालीच नाही त्यामुळे गिरणी कामगार या लाभा पासून अजून वंचित आहेत यासाठी येत्या ६ मार्च २०२५ रोजी गिरणी कामगारांला व वारसदारला मुंबईत मोफत घर मिळाले पाहिजे या मागणीसाठी
सर्व श्रमिक संघाच्या वतीने
चलो आझाद मैदान असे
आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाची पुर्व तयारी म्हणून रविवार १६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२-०० बोडकेनट्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या चलवेनहट्टी, हंदिगनूर,अगसगे, कुरीहाळ,कट्टनभावी, म्हाळेनट्टी, अतिवाड, बेक्कीनकरे, कितवाड,बंबरगा, मण्णीकेरी,केदनूर, या भागातील गिरणी कामगारांची बैठक बोलावण्यात आली आहे तरी या बैठकीला सर्व गिरणी कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन
राजू यल्लाप्पा तवनोजी बोडकेनट्टी
बाळू रामा पाटील हंदिगनूर
मनोहर आप्पाजी हुंदरे चलवेनहट्टी
जोतिबा भरमा पाटील चलवेनहट्टी
केदारी देवाप्पा पाटील अतिवाड यांनी केले आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!