महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने छत्रपती शिवरायांची 395 वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,
दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवमूर्तीला हार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी घोषणांचा जयघोष करण्यात आला.
या वेळी युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, धनंजय पाटील,नगरसेवक शिवाजी मंडोळकर,अशोक घगवे,चंदू पाटील,प्रवीण रेडेकर,इंद्रजित धामणेकर,सचिन दळवी आदी उपस्थित होते.