महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सीमा समन्वय मंत्री म्हणून मंत्री शंभूराज देसाई आणि उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब केले आहे
त्यामुळे मध्यवर्ती म. ए. समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
१७ जानेवारी रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत महाराष्ट्रात लढा उभारण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. त्यावेळी सीमा समन्वयासह इतर मागण्याही उपस्थित करण्यात आल्या होत्या. तसेच सांगली, सातारा, पुणे आणि मुंबई असा लढा जाहीर केला होता. दरम्यान, २१ ते
२३ फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे झालेल्या ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळीही मध्यवर्ती समिती नेत्यांनी शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि इतर मंत्र्यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सरकारने मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांची सीमा समन्वय मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.
समितीच्या पुराऱ्याव्याला यश
