No menu items!
Friday, March 14, 2025

त्या गुन्ह्यात शुभम शेळके यांना जामीन

Must read

रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी मारिहाळ बाळेकुंद्री दरम्यान बस कंडक्टर व युवक,युवती मध्ये तिकीटावरून भांडण झाले होते, याला कंडक्टरने आपला तरुणीशी झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणातुन वाचण्यासाठी मराठी कन्नड भाषिक वादाची फोडणी दिली, त्यामुळे दोन्ही राज्या दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले, याच दरम्यान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी समाज माध्यमावर एक प्रतिक्रिया दिली होती, त्यामुळे कन्नड संघटनांचा पोटशूळ उठला, त्यांच्या दबावाखाली व अकसापोटी पोलीस प्रशासनाने शुभम शेळके यांच्यावर माळ मारुती पोलीस स्टेशन मध्ये 192,352,353, 153, 504 आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, यामध्ये कानडी संघटना विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा ठपका ठेवला होता,

आज द्वितीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती पंकजा कोणूर यांनी हा जामीन मंजूर केला.

हा जामीन मंजूर करण्यासाठी ऍड.महेश बिर्जे,ऍड.वैभव कुट्रे, ऍड. बाळासाहेब कागणकर यांनी परिश्रम घेतले, तर यावेळी माजी महापौर महेश नाईक,विजय बाळेकुंद्री, धनंजय पाटील,नगरसेवक शिवाजी मंडोळकर,मनोहर हुंदरे,विजय जाधव,अशोक घगवे, नारायण मुचंडिकर,सुरज जाधव,ज्ञानेश चिकोर्डे,शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!