मंगसुळी येथील शासकीयहायस्कूलमध्ये शिकवत असतानाहृदयविकाराने शिक्षकाचा मृत्यूझाल्याची घटना घडली. भरत
रामचंद्र शिंदे (वय ४८) असे त्यांचे नाव
आहे. रायबाग तालुक्यातील भिर्डी
येथील रहिवासी असलेले शिंदे मंगसुळीहायस्कूलमध्ये कार्यरत होते.
विद्यार्थ्यांना शिकवत असताना ते अचानक खाली कोसळले. त्यांना लागलीच सहाय्यक शिक्षक एस. एस. शेडबाळे, कदम व अन्य शिक्षकांनी मंगसुळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मिरज येथील सेवासदन रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी आहे.
शाळेत शिकवतानाच शिक्षकाचा मृत्यू
