बेळगाव शहरातील बोगारवेस येथे एका व्यक्तीला त्याच्या मोबाईल फोनमधील सिम कार्डसाठी चाकूने मारहाण केल्याची घटना घडली. हल्लाझालेला व्यक्ती सुरेश वारंग सध्या बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात दाखल आहे. फोन घेऊन सिम कार्ड मागणाऱ्या निखिल कुरणेने मोबाईल फोन कव्हरमधील ४००० रुपयांपैकी १५०० रुपये चोरले. त्यानंतर वादावाद होऊन चाकूने हल्ला करण्यात आला.
यावेळी जखमी सुरेश याने सांगितले की त्याने माझ्या मोबाईलमधून सिम कार्डही घेतले. हल्ला झालेल्या सुरेश वारंगने आरोप केला आहे की निखिल आणि त्याच्या टोळीने त्याच्यावरही हल्ला केला. निखिलने घेतलेले मोबाईल सिम कार्ड आणि पैसे परत मागण्यासाठी गेलो तेव्हा त्याने माझ्यावर हल्ला केला. ही घटना आज दुपारी 12:30 बेळगावातील बोगारवेस येथील हनुमान मंदिराजवळ घडली. सुरेश यांच्या मांडीवर गंभीर हल्ला करण्यात आला. ही घटना खडे बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.