मा. उमेश जी चव्हाण साहेब संस्थापक अध्यक्ष रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र राज्य व सौ. अपर्णाताई साठे मारणे अध्यक्ष पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्राचार्य. श्री आनंद अरुण आपटेकर वैद्यकीय समन्वयक. महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भाग बेळगाव महाराष्ट्र. यांच्याशी लोकांच्या जनकल्याणासाठी आरोग्यविषयक व अनेक मोठमोठ्या आजारांविषयी रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून मा. राजाभाऊ गायकवाड उपाध्यक्ष रुग्ण हक्क परिषद यांनी चर्चा केली. नागरिकांना मदत मिळवून देण्याचं काम आम्ही करत आहोत महाराष्ट्रातील कोणत्याही खेडोपाड्यातील आमच्याकडे जो पेशंट येतो व त्याला मदतीची गरज असते ती आम्ही मा. उमेश जी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून तात्काळ मिळवून देतो अशाच पद्धतीने बेळगाव भागातील 865 ग्रामीण क्षेत्रामध्ये रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने अनेक गावांमध्ये नवीन शाखा ओपनिंग करण्यात येतील.व वैद्यकीय सेवा समिती बेळगाव आपल्या रुग्ण हक्क परिषदेबरोबर जनसेवेचेकाम करण्यास तयार आहे असे प्राचार्य. आनंद अरुण आपटेकर यांनी सांगितले आहे आजच्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी मा. राजाभाऊ गायकवाड उपाध्यक्ष.मा. मंदार देसाई. सदस्य. लक्ष्मण शिंदे सदस्य. उपस्थित होते .
बेळगाव भागातील 865 ग्रामीण क्षेत्रामध्ये रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने अनेक गावांमध्ये होणार नवीन शाखा
By Akshata Naik