हिरेबागेवाडी येथीलअंडरब्रिजजवळ बेकायदा दारू विकणाऱ्या बस्सापूर-हुलीकट्टी येथील एका इसमाला सोमवारी हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून प्रत्येकी ९० एमएलचे ४४ टेटापॅक जप्त करण्यात आले आहेत. बसाप्पा ऊर्फ बसवराज तिप्पाण्णा सुनकुंपी (वय ५१) असे त्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. एका पुठ्याच्या बॉक्समध्ये ४४ टेट्रापॅक ठेवून बसाप्पा त्यांची विक्री करीत होता. याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून ३ लिटर ९६० मिली दारूसाठ्यासह पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याची किंमत १७६० रुपये इतकी होते
बेकायदा दारू विक्री करणाऱ्याला हिरेबागेवाडीत अटक
By Akshata Naik
Previous articleयुवा समिती सीमाभागच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन
Next article8 महिन्याच्या गर्भवतीचा पतीनेच केला खून