पांगुळ गल्ली येथील रेणूका देवीची मुर्ती दर बारा वर्षांनी सौंदती येथील रेणूका देवीला भेटीसाठी जाते. यावेळी ही गेल्या शानिवारी भेटीला जाऊन तेथें विधीपूर्वक अभिषेक पूजा करण्यात आली. दोन दिवस कार्यक्रम आटपून आज सकाळी बेळगाव किल्ला येथून विधिपूर्वक रेणूका देवीची मिरवणूक कामत गल्ली तेंगिंनकेरा गल्लीतून पांगुळ गल्ली येथील मंदिर वाजत गाजत व भंडाराची उधळण करत रेणूका देवीची मुर्ती मंदिरा मध्ये विराजमान झाली दिनांक 30 अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रेणूका देवीची काकण पूजा भव्य प्रमाणत करण्यात येणार आहे .यावेळी देवदादाचे शिष्य किसन मुतकेकर मधु माई. दत्ता कावळे प्रदीप कावळे किरण कावळे विनायक कावळे व कावळे परिवार व इतर भाविक गलीतील नागरिक महिला बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पांगुळ गल्ली येथील रेणूका देवीची मुर्ती दर बारा वर्षांनी सौंदती येथील रेणूका देवीला भेटीला
By Akshata Naik
