शिवजयंतीच्या शुभप्रसंगी संयुक्त शिवभक्त काकती यांच्या वतीने सलग ३० व्या वर्षी शिवज्योत आणण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली पराक्रमाचा अभिमान जागवणाऱ्या या उपक्रमात २५ युवकांनी सहभाग घेतला.गगनगड येथे शिवज्योत सकाळी ठीक 8 वाजता प्रज्वलित कऱण्यात आली. विशेष म्हणजे शिवज्योत ची पूजा संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज चैतन्य महाराज देहूकर (पंढरपूर) यांच्या हस्ते झाली. पारंपरिक वाद्यांचा निनाद, “जय भवानी, जय शिवाजी” च्या गर्जना यामुळे संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला होता. मार्गात येणाऱ्या गावागावांमध्ये शिवरायांच्या स्फूर्ती गीतांचे सादरीकरण करत वातावरण भारावून टाकले.
गावात प्रवेश केल्यानंतर शिवज्योतचे विधिवत पूजन करण्यात आले.
संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज चैतन्य महाराज देहुकर यांच्या हस्ते झाले शिवज्योतीचे पूजन.
