No menu items!
Tuesday, April 29, 2025

खासबाग मधील पुनरुज्जीवित केलेली विहीर महानगरपालिके कडे सुपूर्द प्यास फाऊंडेशन चा उपक्रम

Must read

बेळगावी, २८ एप्रिल:
प्यास फाऊंडेशनच्या वतीने आज मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य कार्यक्रमात बेळगावी शहर महानगरपालिकेकडे पून्नरजिवित केलेली टीचर्स कॉलनी तील विहीर अधिकृतपणे महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात आली. ऐतिहासिक खासबाग मधील ही विहीर, 150 वर्षे जुनी ब्रिटिशकालीन काळातील होती हिचा वापर टिळकवाडी, शहापूर आणि खासबागच्या समुदायासाठी होत असे मध्यवर्ती भागातील ही विहीर कोरीव दगडी बांधकाम मध्ये होती, अनेक दशकांच्या दुर्लक्षानंतर या विहिरीतील पाणी व तिचे सौंदर्य हारवुन गेले होते व ही विहीर बंद स्थितीत होती या विहिरीला गत वैभव प्राप्त करणेसाठी बेळगाव मधील प्यास फाऊंडेशन या नामांकित संस्थाने पुढाकार घेतला व या विहीरीला पुनरुज्जीवित करून पुन्हा नवाने या विहिरीची निर्मिती करून पानाचा प्रश्न सोडवला आहे. या साठी एकेपी फेरोकास्ट आणि बेमको हायड्रॉलिकस यांच्या सीएसआर फंडातून प्यास फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे काम हाथी घेण्यात आले होते या विहिरीला आता पूर्वीचे वैभव प्राप्त झाले आहे.

ही विहीर, आता निळ्याशार निळ्या पाण्याची आणि सुमारे ३०फूट खोल खोलीची ७२ फूट रुंद व २१० फूट अंडाच्या आकारासारखी असून कोरडी न पडता दिवसाला १,००० टँकर पाणी पुरवू शकते एवढी या विहिरी ची शमता असून या विहिरी च्या बाजूने लोखंडी ग्रील चे कंपाउंड मारले आहे तसेच या विहिरीच्या बाजूने जागेभोवती वृक्षारोपण करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. बेळगांव जिल्हाअधिकारी महंमद रोशनजी यांच्या हस्ते बेळगांव महानगरपालिकेच्या आयुक्त सौ. शुभा बी यांच्या हस्ते पुनरुज्जीवन विहीर सुपूर्द करण्यात आली. यावेळी बोलताना डि सी यांनी प्यास फाऊंडेशनच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि फाऊंडेशनच्या पुढील कार्यात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आयुक्त शुभा यांनी लवकरात लवकर पाण्याचा पुरेपूर वापर करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमला बेमकोचे श्री अनिरुद्ध मोहता यांच्यासह एकेपी फेरोकास्टचे श्री राम भंडारे आणि श्री पराग भंडारे यांचा त्यांच्या सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्यास फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी पाहुण्यांचे स्वागत करून फाऊंडेशनच्या ध्येयाची रूपरेषा सांगितली. यावेळी प्यास फाउंडेशनचे सदस्य श्री.अभिमन्यू डागा, डॉ प्रीती कोरे, श्री. सूर्यकांत हिंडलगेकर, श्री. अवधूत सामंत, श्री. दीपक औउळकर, श्री. सतीश लाड, श्री. रोहन कुलकर्णी आणि श्री. लक्ष्मीकांत पसरी यांच्यासह मोठ्या संख्येने टीचर्स कॉलनी श्रिंगारी कॉलनी बाडीवाले कॉलनी कुंती नगर मधील उत्साही नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!