शिवजयंती उत्सव मंडळ कंग्राळ गल्ली बेळगाव येथील कंग्राळ गल्लीतील शिवजयंती उत्सव मंडळ ,पंचमंडळव गल्लीतील सर्व नागरिकांच्या वतीने परंपरेप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली याप्रसंगी अध्यक्ष श्री सुहास नारायण चौगुले व अभिजीत मालोजीराव अष्टेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
श्री शरद पाटील यांच्या हस्ते श्री वेताळ देवस्थानची पूजा करण्यात आली. गल्लीतील जिजाऊ महिला मंडळाच्या सभासदांनी पाळणा व शिवरायांची आरती म्हटली या कार्यक्रमास गल्लीतील पंच श्री शंकर बडवानाचे श्री मालोजी अष्टेकर श्री बाबुराव कुटरे श्री अशोक कंग्राळकर श्री रमेश मोरे श्री दौलत मोरे तसेच गल्लीतील अनंतराव पाटील प्रकाश पाटील अमित उसूलकर बाबुराव इंगोले दिगंबर कातकर किरण बडवानाचे, महादेव कंग्राळकर विलास कंग्राळकर, अनिल वाडेकर, रोहन निळकंठचे, विशाल चव्हाण, गजानन सांबरेकर सचिन चौगुले, बाळू जाधव, महेश मोरे कल्लाप्पा हुर्डेकर, महेश इंगोले, शिवाजी काकतकर, सुरज काकतकर, दिगंबर मोरे, विनायक सांबरेकर, जगन्नाथ कंगराळकर, किशोर पाटील लक्ष्मण पाटील, भालू
इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस पहलगाव काश्मीर येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमासाठी गल्लीतील नागरिक, महिला बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंग्राळ गल्लीत शिवजयंती साजरी
