बेळगाव गेल्या एकशे १०६ वर्षांपासून बेळगावात परंपरेप्रमाणे अक्षय तृतीयेला शिवजयंती साजरी करण्यात येते यावेळी अवघी शिवसृष्टी बेळगाव नगरीत अवतरलेली असते. शेकडो चित्ररथ शिवरायांच्या पराक्रमावर अधारीत देखावे शिवभक्तांसाठी घेऊन येत असतात याच निमित्ताने बेळगावात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच युवा समितीचे पदाधिकारी आणी बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते
बेळगावात पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली
