भारत व पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जम्मू-काश्मिरमधून बेळगावात परतलेल्या जवानाच्या कुटुंबाने तेथील परिस्थिती सांगितली भारतीय सैनिक पाकिस्तानबरोबर लढत आहेत. तीन दिवसांपूर्वी आम्ही जम्मू आणि काश्मीरहून रेल्वेमध्ये बसलो आणि प्रवास केला. आम्ही पाकिस्तान सीमेपासून २५ किमी अंतरावर होतो. माझे पती त्या ठिकाणी सेवा बजावत आहेत.यावेळी पतीला सोडून येताना अंः तकरण जड झाले .मात्र, युद्ध सुरु असल्यामुळे आम्हाला घरी पाठवून पती देशाच्या संरक्षणासाठी थांबले याचा अभिमान असल्याचे जवानाच्या पत्नीने सांगितले.
तसेच जम्मूमध्ये जर तुम्हाला सायरन ऐकू आले तर तुम्हाला भितीने पळून जावे लागते आणि अंधारात रहावे लागते. जम्मू-काश्मीर सीमेवर आता भीतीचे वातावरण आहे. आमचे पती आम्हाला सोडून जाऊ इच्छित नव्हते. पण, ते सर्वांना घरी पाठवून देशसेवा करण्यासाठी तेथेच थांबले आहेत असे जम्मू हुन बेळगावला आले असता सर्व परिस्थिती सांगितली
पतीला सोडून येताना अंः तकरण जड जवानांच्या पत्नी च्या भावना
