4 जे आर ह्यूमन राइट्स केअर ऑर्गनायझेशन यांच्या वतीने आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या मंत्र्यांना निपाणी मध्ये तालुकास्तरीय रुग्णालय आणि सुविधा देण्याबद्दल निवेदन दिले होते. निवेदन देऊन दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी या निवेदनाची दखल घेण्यात न आल्याचे पाहायला मिळाले आहे.
निपाणी नगरला तालुका दर्जा मिळाला आहे आणि त्यांचा निपाणी नगर लोकवस्तीत आहे पण निपाणी नगरला तालुका दर्जा मिळाला तरी रुग्णालयाच्या निकृष्ट सुविधा पाहून ह्यूमन राईट स्केअर ऑर्गनायझेशन ने आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याकडे ते सुविधा पुरवावी अशी मागणी केली होती
येथील रुग्णालय अनेक समस्यांमध्ये सापडले आहे तसेच एक्स-रे स्कॅनिंग मशीन चा अभाव असल्याचे म्हटले आहे येथील गांधी रुग्णालयाच्या बाबतीत या सर्व समस्या आहेत.
बेळगाव आणि कोल्हापूरच्या रुग्णांना गांधी रुग्णालय नजीक असल्याने या रुग्णालयात सर्व त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र या निवेदनाची दखल घेण्यात न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे