रेल्वेच्या धडकेत चार रानडुकरांचा मृत्यू झाला. लोंढा-मिरज लोहमार्गावरील इदलहोंड रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रविवारी (दि. ८) सकाळी ही घटना उघडकीस आली. वनखात्याने घटनेची नोंद करुन घेतली आहे.
रात्रीच्या वेळी लोहमार्ग ओलांडताना ही घटना घडली. सकाळी इदलहोंड-गर्लगुंजी मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास
आला. घटनेची माहिती रेल्वे पोलिस व वनखात्याला देण्यात आली. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यापूर्वीही या ठिकाणी रेल्वेच्या धडकेत रानडुकरांचा मृत्यू झाला होता. खानापूर तालुक्यात रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. यापूर्वी बिबटे, गव्यांचाही मृत्यू झाला आहे