आषाढी यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपले आहे. आषाढी यात्रेवर महापुराचे सावट आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असतानाच आज शुक्रवारी सकाळी सातच्या दरम्यान चंद्रभागा नदीत फक्त पुंडलिक मंदिराजवळ बुडून बेळगाव येथील शुभम पावले ( वय 27 ) या युवकाचा मृत्यू झाला आहे. आपल्या मित्रांसोबत तो विठुरायाच्या दर्शनासाठी आला होता. आज सकाळी नदीमध्ये अंघोळीला गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तब्बल चार तासांच्या शोध कार्यानंतर शुभमचा मृतदेह आढळून आला. आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीमध्ये पवित्र सणासाठी भाविकांची गर्दी होत आहे. तरी प्रशासनाने या ठिकाणी जीव रक्षक यंत्रणा सज्ज ठेवावी अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीत बुडून तरुण भाविकांचा मृत्यू
By Akshata Naik

Must read
Previous article9 दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरटा गजाआड
Next articleमाॅडर्न जिम मध्ये योग दिन उत्साहात