No menu items!
Wednesday, July 9, 2025

शनी वक्री, रविवार दि. १३ जुलै

Must read

न्याय आणि कर्माचा देव म्हणून ओळखला जाणारा शनी देव रविवार दि. १३ जुलै रोजी मीन राशीत वक्री होणार आहे.त्या निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या नंतर शनी पुन्हा मीन राशीत भ्रमण करेल.एकूण १३१ दिवस शनी वक्री स्थितीत राहणार आहे.शनी वक्री स्थितीत राहिल्यामुळे त्याचे अनुकूल आणि प्रतिकूल असे परिणाम पुढील १३१ दिवस दिसून येतात.
मेष – रखडलेल्या कामामध्ये मनासारखे यश मिळेल.वादविवाद टाळा. आर्थिक व्यवहारात फटका बसण्याची शक्यता.
वृषभ – एखाद्या व्यक्तीची भेट फायदेशीर ठरेल. नोकरी, व्यवसायात त्रास संभवतो.
मिथुन – कठोर परिश्रमामुळे यश मिळेल. शक्यतो वाद टाळा.
कर्क – समाजात आदर वाढेल. मित्रांच्या सहकार्याने प्रगती होईल.मानसिक त्रास जाणवेल.
सिंह – उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे.आर्थिक व्यवहार जपून करावेत.
कन्या – भागीदारी व्यवसायात जपून व्यवहार करा. आरोग्याच्या तक्रारी उदभवतील.
तूळ – यश मिळण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक.
वृश्चिक – मानसिक ताण वाढण्याची शक्यता. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करावी.
धनु – नाते संबंधात वादविवाद टाळा.अस्थिरता जाणवेल.अडचणींना धीराने तोंड द्यावे लागेल.
मकर – कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार करू नका.डोके शांत ठेऊन निर्णय घ्या.
कुंभ – जीवनात अनेक चढ उतार जाणवतील. मानसिक त्रास होईल.मन शांत ठेवा.
मीन – सुख शांतीचा अनुभव घ्याल.आव्हानांना तोंड द्यावे लागेल.आर्थिक नुकसानीची शक्यता असल्याने आर्थिक व्यवहार जपून करावेत.
रविवार दि. १३ जुलै रोजी शनी वक्री होत असल्याने मंदिरात तैलाभिषेक, शनी शांती, तीळ होम करण्यात येणार आहेत. अभिषेक आदि सेवा करण्यासाठी भक्तांनी मंदिरात अथवा विलास अध्यापक, ट्रस्टी – पुजारी यांच्याशी मोबाईल 9480417688 या क्रमांकावर संपर्क साधावा.या दिवशी तेल, लोखंडी वस्तू, उडीद, मूग, कांबळे, गूळ यांचे दान करणे लाभदायक ठरते. शक्य असेल त्यांनी अन्नदान करावे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!