आज बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील मुगलीहाळ गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे .एका हेस्कॉम लाइनमनचा विजेच्या खांबाला लटकून मृत्यू झाला.
मृताचे नाव मारुती अवली (२५) असे आहे. तो बागरनाळ गावातील लाइनमन होता. तो ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी विजेच्या खांबावर चढला असताना ही घटना घडली.
धक्कादायक म्हणजे, त्याचा मृतदेह ३ तासांहून अधिक काळ खांबाला लटकत राहिला .यावेळी माहिती देऊन देखील हेस्कॉमचे अधिकारी वेळेवर पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झालाय .या प्रकरणामुळे
मुगलीहाळच्या ग्रामस्थांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केलाय
ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी चढला आणि विजेचा धक्का लागून लाईनमनचा मृत्यू
