9 डिसेंबर 2024 रोजी बेळगाव येथे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन भरले होते, त्या अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र केस समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला होता, पण महामेळाव्याला परवानगी नाकारण्यात आल्याने समिती नेते व कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी महाराज चौकात महामेळावा सभा घेण्याचे घोषित केले, धर्मवीर संभाजी महाराज चौकात बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर तालुका व विविध भागातून समितीचे नेते व कार्यकर्ते जमले त्यांना पोलिसांनी अटकाव व दडपशाही करून अटक केली. आकसापोटी खडेबाजार पोलीस ठाण्याचे एएसआय व्ही.चिनास्वामी यांच्या फिर्यादीनुसार प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किनेकर, दिगंबर पाटील, रामचंद्र मोदकेकर,आबासाहेब दळवी,गोपाळ देसाई,राजू किनेकर,शंकर कोनेरी,गोपाळ पाटील यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जेएमएफसी तृतीय न्यायालयात पोलिसांकडून चार्जशीट दाखल करण्यात आले आहे.
संशयितांच्या वतीने एडवोकेट महेश बिर्जे, बाळासाहेब कागणकर, एम.बी.बोन्द्रे,रिचमन रिकी,वैभव कुट्रे हे काम पाहत आहेत.