कर्नाटक रोलर स्केटिंग असो व बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे तिसरी कर्नाटका रँकिंग रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन शिवगंगा स्पोर्ट्स क्लब ओम नगर येथे दिनांक 11 ते 13 रोजी करण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये कर्नाटक राज्य तून सुमारे 300 वर टॉप स्केटर्स सहभागी होणार असुन 15 हून अधिक ऑफिशल,15 जनाची रेफ्री, 20 हून अधिक स्वयंसेवक आणि 4 लोकांची डॉकटर ची टीम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तयार असणार आहे या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे कर्नाटका रोलर स्केटिंग असो जनरल सेक्रेटरी इंदूधर सीताराम, बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे अध्यक्ष उमेश कलघटगी, शिवगंगा स्पोर्ट्स क्लब च्या अध्यक्षा ज्योती चिंडक, प्रसाद तेंडुलकर,अशोक गोरे, शिवशंकर मल्लूर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत सर्व बेळगांवकराना ही स्पर्धा पाहण्यासाठी खुली असुन याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आले आहे
तिसऱ्या कर्नाटका रँकिंग रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी बेळगांव नगरी सज्ज
