महिला विद्यालय प्राथमिक मुलींची शाळा कॉलेज रोड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पत्रकार अक्षता नाईक उपस्थित होत्या यावेळी मुलींनी स्वागत गीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर फोटो पूजा आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर वार्षिक परीक्षेत प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका शुभांगी पंडित, वर्धा गोडसे जोशी यांच्यसह विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
महिला विद्यालय प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा साजरी
