कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये शंभर टक्के कन्नड सक्तीचा फतवा निघाला त्या फतव्याला विरोध करण्यासाठी युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैठकमध्ये कन्नड सक्ती थांबविण्यासाठी तसेच सर्व सरकारी ठिकाणी मराठी भाषेचा वापर करण्यात यावा यासाठी लोक प्रतिनिधींची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने उद्या मंगळवार दिनांक १५ रोजी बेळगावाच्या महापौरांची भेट घेण्यासाठी सकाळी ११-३० वाजता महानगरपालिका बेळगाव येथे उपस्थित राहावे असे आवाहन युवा समिती सिमाभागच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने महापौर व लोक प्रतिनिधींची घेणार भेट
By Akshata Naik
