राज्य सरकारने मंगळवारी ३४ आयपीएसअधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला.
यामध्ये रोहन जगदीश, IPS (केएन 2019) पोलिस उपायुक्त, कायदा आणि सुव्यवस्था, बेळगाव शहर यांची बदली करण्यात आली आहे
तर आता त्यांची गदग जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी बेळगाव पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत कायदा आणि सुव्यवस्थेचे डीसीपी म्हणून नियुक्त केले होते.पुढील आदेशापर्यंत त्यांना गदगचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गदगचे बाबासाहेब नेमागौड, आयपीएस यांची बदली करण्यात आली आहे. रोहन जगदीश यांनी सप्टेंबर 2023 मध्ये बेळगाव येथे सेवा सुरु केली होती
DCP रोहन जगदीश यांची बदली
