बेळगावचे सुपूत्र व विजापूरचे अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शंकर मारीहाळ गुरुवारी (दि. ३१) पोलिस खात्यातील ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. यानिमित्त विजापूरमधील हनुमंतराय, रंग मंदिरात दुपारी दोन वाजता त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी विजापूरचे जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी उपस्थित राहणार असून प्रमुख लोकायुक्त विभागाचे जि. पो. प्रमुख टी. मल्लेश, अतिरीक्त जि. पो. प्रमुख रामनगौडा हट्टी, कमांडंट ऑफिसर प्रसन्नकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शंकर मारीहाळ यांनी गेल्या ३१ वर्षात राज्यभरातील विविध पोसिस ठाण्यांमध्ये उपनिरीक्षक, सीपीआय, डीएसपी, एसीपी पदाबरोबरच अतिरिक्त जि. पो. प्रमुख म्हणून सेवा बजावली आहे.
बेळगावचे सुपुत्र, विजापूरचे अति. पोलिसप्रमुख आज निवृत्त
