महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत कर्ले येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य एन. बी. कुगजी होते.
युवा समितीचे मच्छे येथील सहकारी श्री. केदारी करडी यांनी “सीमाभागात मराठी भाषा संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा एक भाग म्हणून युवा समितीच्या माध्यमातून गेल्या ८ वर्षांपासून ३०० शाळा आणि ५००० विद्यार्थ्यांना साहित्य वितरणाचे कार्य अविरतपणे सुरु असल्याची माहिती दिली.
यावेळी शाळेचे शिक्षक श्री एन. पी. रेडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. पी. व्ही. पाटील यांनी आभार मानले. यावेळी ज्योतिबा मुरकुटे नवनाथ खामकर, रवळु तारिहाळकर, विठ्ठल मोरे, ज्योती खेमनाळकर, लक्ष्मी खेमनाळकर, अमृत खेमनाळकर आदी उपस्थित होते.
जानेवाडी येथील प्राथमिक मराठी शाळेत देखील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री वाय पी अष्टेकर यांनी केले तर सूत्रसंचालन के आर पाटील यांनी केले तर एम बी नाईक यांनी आभार मानले.
कर्ले व जानेवाडी येथे युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण
